नांदगाव प्रतिनीधी – अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र (राज्य) या सामाजिक संघटनेच्या नांदगाव तालुका कार्यकारिणीच्या वतिने कोरोणा व्हायरस व लाॅकडाऊन कालावधीत ज्या समाजधुरिंनी स्वताच्या जिवाची पर्वा न करता संसर्गजन्य परिसरीतील पाॅझीटीव्ह क्षेत्रात जावुन सेवा केली अशा समाजधुरिंचा समितीच्या वतीने शाल गुलाबपुष्पे सन्मानपत्र देऊन समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्र दादा जाधव यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच काही पदाधिकाऱ्यांना समितीचे पदे देवुन जबाबदारी सोपविण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मा.राजाभाऊ गांगुर्डे यांनी केले तर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव नायब तहसीलदार मा.योगेश जमदाडे, नगराध्यक्ष मा.राजेश कवडे, वैद्यकीय अधीकारी डाँ.रोहन बोरसे, सामाजिक कार्यकर्ते मा.दत्तराज छाजेड, पोलीस निरीक्षक मा.दळवी साहेब, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.वसंतराव वाघ, उपनगराध्यक्ष मा.नितिन जाधव, निफाड तालुकाध्यक्ष मा.शिलाताई जाधव, निफाड तालुका कार्याध्यक्ष ओझरच्या सरपंच मा.आशाताई जाधव, ओझर शहर अध्यक्ष मा.रेखा जाधव, अँड. नितीन साळवे, रिपाई नेते कपिल तेलोरे, वामन पोतदार, आदी. मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी ईयत्ता १० वी १२ च्या ९०% मार्क मिळवणारया गुणवंत विद्यार्थ्यांचा गोल्डमेडल देवुन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी वरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन कोविड योध्दांचे अभिनंदन केले व अआनिस च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री महीला ता.अध्यक्ष नेहाताई कोळगे, सुरेखाताई ढाके, विद्याताई जगताप, किरण गवळे, सुदाम राठोड, शोभा पगारे, स्मिता घनगवाल, वर्षा मोरे, काळु चव्हाण, धोंडीराम चव्हाण, माधव मोरे,लक्ष्मण पवार, राजाभाऊ मोरे, रविंद्र लोखंडे, उज्ज्वला रावे, आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता घनगवाल यांनी तर आभार किरण गवळे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Home Breaking News नांदगाव तालुका अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे कोविड योध्दा पुरस्काराने समाजसेवक सन्मानित...