सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड भराडी रोडवर असलेल्या वांगी बुद्रुक फाटा ते वांगी बुद्रुक गाव या एक किलोमिटर रस्त्याची मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली होती.रोडवरील डांबर व खडी वाहुन गेल्याने रोडवर मोठ मोठे खड्डे पडलेले होते.व त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता.ग्रामपंचायतने संबंधित विभागाला रोड दुरूस्ती करण्यासंदर्भात पञ दिलेले होते.परंतु त्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण वाढतच असल्याने रोडवरून प्रवास करतांना गावक-यांना व वाहनधारकांना खड्यांचा व चिखलातुन वाट काढतांना मोठी कसरत करावी लागत होती.सदरील रोड ग्रामपंचायत हद्दीत येत नसतानाही बुधवार रोजी सरपंच महेश पाटील यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून सदरील रोडवर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकुन खड्डे बुजवण्यास सुरूवात केली असुन मुरूम टाकल्यानंतर गावक-यांना दिलासा मिळणार आहे.
वांगी फाटा ते वांगी बुद्रुक गाव या एक किलोमिटर रस्त्याच्या कामासंदर्भात मी संबंधित विभागाच्या अधिक-यांशी चर्चा केली व ग्रामपंचायतीचे रोड दुरूस्ती करण्यासंदर्भात पञसुद्धा देण्यात आलेले आहे.परंतु पावसाळा संपल्यानंतरच सदरील रोडची पाहणी करून कामाची मंजुरी घेऊन कामास सुरूवात करण्यात येईल असे सांगण्यात आले.ग्रामपंचायतच्या माध्यमातून सदरील रोडवर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकुन खड्डे बुजवण्यात येत आहे.जेणेकरून गावक-यांना चिखलाचा व खड्यांचा समना करावा लागणार नाही.-महेश पाटील,सरपंच वांगी बुद्रुक
Home Breaking News सरपंच महेश पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोडवरील खड्डे बुजवण्यास केली सुरूवात