सारोळा येथील गैयबंशावली व गैहिनिनाथ यात्रा महोत्सव कोरोनामुळे रद्द

0

सिल्लोड ( प्रतीनिधी :-विनोद हिंगमीरे) दरवर्षी पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्ताने गैयबंशावली व गैहिनिनाथ यात्रा महोत्सव कोरोनाच्या शिरकावामुळे रद्द करण्यात आला आहे.दि.१९(बुधवार)रोजी सारोळा(ता.सिल्लोड) येथे होणारा एकदिवसीय  पोळा-पाडवा गयंबानशहावली व गैहिनीनाथाची भव्य एकदिवसीय यात्रा रद्द करण्यात आले आहे.दिवसेंदिवस महामारी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालेला आहे.याची दक्षता घेत ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस प्रशासन यांच्या सयुक्त विद्यमाने यात्रा करण्यात आली आहे.
सारोळा येथिल यात्रेत हिंदू-मुस्लीम समाजबांधवाच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून या यात्रेकडे पाहीले जाते. दोन्ही समाजबांधव या यात्रेत लाखोच्या संख्येने सहभागी होऊन यात्रा उत्साहात साजरी करतात.पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी याठिकाणी बैलांना दर्शनासाठी घेऊन येतात.याठिकाणी यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बसेस सोडण्यात येतात.मात्र कोनाच्या पार्श्वभूमीवर यामुळे ग्रहण लागले आहेत.तसेच यात्रेदरम्यान कायदा सुव्यवस्था सुरळित राहावी व यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो,यात्रेमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र भागात पार्कींग व्यवस्था करण्यात येते.या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक शेतकरी वर्ग बैलगाडी चा वापर करतात.यात्रेमध्ये नवस पुर्ण करण्यासाठी नवसाचे तगतराव, मल्लखांब खेळणाऱ्या पहिलवानांची खांबावरील कसरत आदी वैशिष्ट्य यात्रेमध्ये पाहायला मिळतात. याठिकाणी दर्शनासाठी पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थांसह मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,खान्देशातील जळगाव,विदर्भातील बुलढाणा आदी जिल्ह्यातील भाविक गर्दी करतात.मात्र यावर्षी अनेक वर्षाची असलेला यात्रा महोत्सव कुठेच साजरा करण्यात येणार नाही,त्यामुळे श्रद्धामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार नाही.यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुठलीच खेळणीची दुकाने, हाॅटेल,तगतराव बलखांब,नागरिकाची वर्दळ याठिकाणी होणार नाही. कोरोनाला हरवण्यासाठी भाविकांनी ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.अनेक वर्षाची परंपरा असलेला यात्रा महोत्सव यावर्षी रद्द करण्यात आले आहे.यावर्षी सर्वत्र कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे.यामुळे कोणाच्या ही जिवाला धोका होणार नाही, गर्दी होऊन कोरोणाचा फैलाव होऊ नये यासाठी सदरील निर्बध घालण्यात आले आहेत याची सर्व भाविकांनी नोंद घेवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.भाविकांन नम्र आवाहन: सारोळा ता सिल्लोड येथिल आराध्यदैवत असलेले गैयबंशावली,गैहिनिनाथ संस्थांन याठिकाणी दरवर्षी पोळा,पाडवा यात्रा महोत्सव असतो,
भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात,मात्र यावर्षी कोनाचा सर्वत्र शिरकाव झाल्यामुळे यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here