सिल्लोड शहरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या मुख्यमंञ्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्या प्रकरणी या घटनेस तेथील भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आरोप करत शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करून कर्नाटकाचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाडे पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, धैर्यशील तायडे,नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील,राजेंद्र गौर,तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे, दत्तात्रय पवार, संतोष धाडगे, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे,गौरव सहारे, माजी नगरसेवक सुशील गोसावी, शेख इम्रान,संजय मुरकुटे,रवी गायकवाड,गणेश डकले, लखन ठाकूर, बाळू पचोरी,आनंद शिरसाठ,सतीश शिरसाठ आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here