सिल्लोड ( प्रतिनिधी : विनोद हिंगमिरे ) आमठाणा- सिल्लोड तालुक्यातील शिंदे फळ येथे सोमवार रोजी कोविड तपासणी घेण्यात आली गावांत तीन चार दिवसापूर्वी 14 रुग्ण आढळून आले होते याकरिता संपर्काततील व्यक्तीची कोविड तपासणी करण्यात आली जवळपास 77 जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये शिंदेंफळ 7 तळणी 2 कसोद 2 देऊळगाव वाडी 2 असे एकूण परिसरातील 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
या कॅम्प साठी आरोग्य अधिकारी कृष्णा चौधरी,राम चौधरी,महाजन आरोग्य सेविका जाधव, आरोग्य सेवक डॉ काथार,काळसरे राजेंद्र उमरिया, रामेश्वर मुळे, गोविंद ताटू,तेलंगराव,गुंजाळ, साहेबराव शिंदे रामेश्वर वाघ, गजानन सोमसे, किशोर मुळे आदींनी मेहनत घेतली कोरोणा पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.करिता ग्रामपंचायत प्रशासनातर्फे गाव सील करण्यात आले. या कॅम्पला सभापती कल्पना जामकर, बीडीओ दाभाडे ,यांनी भेट देऊन पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असलेल्या नागरिकांना कोरंनटाईन राहण्यचे अवहान केले आहे, यावेळी सरपंच,कबिरचंद् भोपळे, पोलीस पाटील संदीप ढंगारे ग्रामसेवक .इत्यादींची उपस्थिती होती. तर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावात ग्रांमपंचायच्या वतीने धूळ फवारणी करुन परिसर निर्जुतीकरण करण्यात आला व त्यांचा राहण्यात असलेला परिसर सील करण्यात आला आहे नांगरिकांनी घाबरु न जाता काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभाग व पोलीस प्रशासना तथा गावातील लोक प्रतिनिधीच्या वतीने करण्यात आले आहे.