वांगी बुद्रुक गाव ते वांगी बुद्रुक फाटा रस्ता दुरूस्तीची जबाबदारी कोणाची

0

सिल्लोड (  प्रतीनिधी :-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गाव ते वांगी बुद्रुक फाटा या रोडची अत्यंत दुरावस्था झाल्याबात ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित बांधकाम विभागाला रोड दुरूस्ती संदर्भात पञ दिलेले आहे.परंतु संबंधित विभागाकडून वांगी बुद्रुक येथील रोडला भेट द्यायलाही वेळ मिळत नसल्याने कुठल्याही प्रकारची पाहणी केलेली नाही.
सदरील एक किलोमीटर रोड हा ग्रामपंचायत हद्दीत येत नसल्याने व बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने सदरील रोड तात्पुरत्या स्वरूपात का होईना दुरूस्ती करण्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न गावक-यांना पडला आहे.मागील दोन महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने या एक किलोमिटर रस्त्यावरील संपुर्ण डांबर व खडी मोठ्या प्रमाणात वाहुन गेली असल्याने रोडवर चिखल साचत असुन मोठ मोठे खड्डे पडलेले आहे.रोडवर पडलेल्या चिखलामुळे व खड्यामुळे नागरिकांना पायी चालणे देखील अवघड होऊन बसले आहे.मोटरसायकल व चारचाकी वाहन स्लीप होऊन रोडच्या आजुबाजुच्या बराशीत जाण्याची भिती निर्माण झाली आहे.या रोडने चारचाकी वाहन समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना साईड देतांना वाहन चिखलात फसण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.तरी संबंधीत विभागाने सदरील रोडची जबाबदारी घेऊन तात्पुरत्या स्वरूपात का होईना रोडची दुरूस्ती करून देण्याची मागणी गावक-यांकडुन करण्यात येत आहे.नसता सिल्लोड-भराडी रोडवर असलेल्या वांगी बुद्रुक फाट्यावर रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे वांगी बुद्रुक येथील गावक-यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here