लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वांगी येथे उत्साहात साजरी

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जन्मशताब्दी जयंती मोहत्सवाचे आयोजन मानवहीत लोकशाही पक्षाचे सिल्लोड तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड व समाजबांधवाच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा उत्सवसमीतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे,भराडी बिट जमादार विठ्ठल चव्हाण,पोलीस कर्मचारी विष्णू पल्हाळ,विलास सोनवणे,विकास नायसे,पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, सुरेश साळवे आदी उपस्थित होते.यानंतर  ग्रामपंचायत  कार्यालयामध्ये विष्णू साळवे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन   मुख्याध्यापक डि.एम देशमुख यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.यावेळी रघुनाथ साळवे,भगवान साळवे,संजय काकडे, बाबुराव गायकवाड,रतन गायकवाड,संपत गायकवाड,संजय निकाळजे,किशोर गायकवाड,कैलास गायकवाड, दौलत गायकवाड,गजानन गायकवाड,परमेश्वर गायकवाड,दौलत गायकवाड आदी ग्रामस्थ व समाजबांधवांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here