केळगाव येथील पीकविमा भरण्यासाठी पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण पिकविमा अंतिम एक दिवसावर अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) केळगाव खरीप पिक विम्याची आॅनलाईन अर्ज भरताना शेतकर्‍यांना मोठी तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत पाहावण्यास दिसत आहे पिक विमा भरण्यासाठी मुदत 31 जुलैपर्यतच असल्याने अनेक शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे
महाभुमिलेख आधार आणि विमा कंपनीची वेबसाईट एकाच वेळी सुरु राहल्यास आॅनलाईन अर्जाची प्रक्रिया पुर्ण होते पण तिने वेबसाईट काही ही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे पिक विमा काढण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे विमा जर शेतकर्‍यांनी भरला नाही पर पिक विमा दाखवत असलेले शेतकरी भयभीत झाले आहे नेमका हा प्रकार चालला काय यामुळे शेतकरी चिंचवेत सापडले आहे तरी विमा कंपनी याकडे तात्काळ लक्ष देत असेच प्रशासनाने ही अडचण लवकरात लवकर मिळावी अशी शेतकर्‍यांकडून बोलले जात आहे
केळगाव येथील मागील वर्षी शेतकर्‍याने भरलेला विमा अजुनपर्यत मिळाल्या पासून वंचीत राहिले आहे दरवर्षी शेतकर्‍यांना अनियमित पावसाचा पावसाचा फटका बसतो त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळावा यासाठी पिक विमा योजना सुरु केली आहे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला निशचीत उत्पनाचे नुकसान भरपाई सामुहीक सुरुपात मिळावी या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे शेतकर्‍यांच्या प्रतिकुल हवामान घटकामुळे पेरणी,लागवड होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले पीक पेरणीतुन काढणीपर्यत यांच्या कालवधीत पिकाच्या उत्पदनात येणारी गठ काढणी नैसगिक आपत्ती या बाबतीत करीता विमा संरक्षण मिळणार आहे
विम्याची अर्ज भरण्याची 31 जुलै ही मुदत आहे विमा कंपनीचे सर्व स्लो झाले आहे त्यामुळे अनेक शेतकरी अर्ज भरण्यासाठी गेले असता हा अडथळा निर्माण झाला आहे तरी पिकविम्याची तारीख वाढवावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केले आहे
एका अर्जसाठी लागतो अर्धा तास
ग्रामिण भागात विजेचा लंपडाव सुरु असतो तसेच नेटही राहत नसल्याने पिक विम्याची अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांना ताटकळत बसावे लागत आहे 7/12 सात ते आठ वेळा गट न. टाकल्यानंतर प्रमाणे होत असल्याने शेतकर्‍यांनाचा मोठा वेळ जात आहे तात्रिक बिघाडामुळे कर्ज भरण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट लागतात तसेच मिश्र पिक एकच टाकण्यास अर्ज होत नसल्याने चित्र दिसत आहे त्यावेळी प्रत्येक वेळी एका एका पिकाची निवड करावी लागत असल्याचे अर्ज भरण्यास विलंब होत आहे एक दिवस शिल्लक
पिक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै मुदत आली होती परंतू ग्रामिण भागात पोर्टलमध्ये अडचण निर्माण होत आहे यामुळे आॅनलाईन नोंदणी संथ गतीने सुरु आहे जुलै अखेरीस मुदत संपत आल्याने शेतकर्‍यांनी महा ई सेवा केन्द्रात शेतकर्‍यांनी एकच गर्दी केली होती.पण त्याचवेळी इंटरनेटची संथ गती व वीज पुरवठ्याचे लोडशेटिंग समस्या निर्माण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण कायम असल्याचे दिसून येत आहे
पिकविमा भरण्याची एक दिवसावर येऊन ठेपला आहे अजून बर्‍याचशा शेतकर्‍यांनी पिकविमा भरलेला नाही एवढ्या कमी दिवंसात शेतकर्‍यांना पिक विमा भरणे शक्य नाही शासनाने पिकविमा भरण्याची तारीख वाढवून द्यावी
फकिरा आप्पा हिंगमीरे शेतकरी केळगाव
पोर्टलला तांत्रिक अडचण येत आहे सोमवारपासुन अडचणी कायम होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे पीक विमा अर्ज ऑनलाइन महा ई सेवा केंन्द्रवर पडून आहे
नितिन बदर महा ई सेवा केंन्द्र संचालक केळगाव,
सिल्लोड तालुक्यातील केळगाव महा ई सेवा केंन्द्र दिवसभर सातबारे व पिक विमा भरण्यासाठी गर्दी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here