औंरगाबाद तालुक्यातील वडखा वरझडी येथील नाथनगर तलावात पाच जनांचा मृत्यू

0

औंरगाबाद ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) औंरगाबाद तालुक्यातील वडखा वरझडी येथील नाथनगर तलावात पाच जनांचा मृत्यू झाल्यामुळे औंरगाबाद तालुक्यात खळबळजनक ऊडाली आहे. एकाच कुंटुबांतील तिघाचा मृत्यू झाला आहे,
1) समीर शेख मुबारक शेख वय 17 वर्ष
2) शेख अन्सार शेख सत्तारा वय 17 वर्ष
3)आतीक युसुफ शेख वय 18 वर्ष
4) तालेब युसुफ शेख वय 21 वर्षे
5) सोहेल युसुफ शेख वय 16 वर्षे सर्व राहणार भालगाव हे मजुरी ने गोबी काढण्यासाठी वरझडी तालुका औरंगाबाद येथे गेले होते . दुपारी 13.00 वाजेच्या सुमारास परत भालगाव येथे जाताना नाथनगर तलाव येथे आंघोळ करण्यासाठी थांबले होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून स्थानिक गावकरी व फायर ब्रिगेड यांच्या मदतीने पाचही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून घाटी दवाखाना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here