मालेगाव शहरात बकरी-ईद सण शांततेत पार पडला

0

मालेगाव –  दिनांक 01/08/2020 रोजी मालेगाव शहरात बकरी-ईद सण शांततेत पार पडला. मालेगाव येथे मा.पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली वेळोवेळी बकरी-ईद सणानिमत्ताने शहरातील प्रतिष्ठित नागरिक,शांतता समिती सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी बकरी-ईद निमत्ताने कॊनीही रस्याववर येणार नाही व आपापल्या घरीच नमाज पठण करून घरीच कुर्बाणीचा कार्यक्रम करतील व बकरी-ईद सण शांततेत पार पाडतील असे नागरिकांना आवाहान करण्यात आले होते. तसेच बकरी-ईद च्या निमित्ताने पोलीस प्रशासनास मदत करण्यासाठी विविध मौलाना यांच्या मार्फतीने नागरिकांना व्हिडिओद्वारें सूचना देण्यात आल्या होत्या की, बकरी-ईद च्या दिवशी आपापल्या घरीच राहावे व कुर्बाणीचा कार्यक्रम घरीच करावा नमाज पठनासाठी कोणीही मस्जिद मध्ये येणार नाही.त्याप्रमाणे मालेगाव शहरातील नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनास सहकार्य करून बकरी-ईद निमत्ताने कॊनीही घराबाहेर न पडता घरीच राहून सण मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडला या बद्दल मा.पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह मॅडम, यांनी सर्व मालेगाव शहरातील नागरिकांना बकरी-ईद सणा निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचे धन्यवाद व्यवत केले आहे.तसेच दिनांक 02/08/2020 व दिनांक 3/08/2020 रोजी बकरी-ईद निमत्ताने होणारे कार्यक्रम घरीच साजरे करावे व पोलीस प्रशासनस सहकार्य करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here