
सिल्लोड ( प्रतिनिधी: विनोद हिंगमीरे ) कोरोना महामारी मुळे सर्व शाळा बंद आहेत.शाळा बंद असल्या तरी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा केंद्रात आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री शिरसाट साहेब केंद्रप्रमुख श्री कुंभारे साहेब यांच्या प्रेरणेने शिक्षण मात्र चालू आहे . आमठाणा केंद्रातील आधार वाडी तांडा शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू न देता शिक्षण चालू आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास नागरगोजे सर व सह शिक्षक बनसोड सर तांड्यात घरोघरी फिरून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याची पवित्र काम करत आहेत .त्यांनी आज दिनांक31/07/2020 विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन स्वाध्याय कृती पुस्तिकेचे वाटप केले . तसेच अभ्यास प्रेरक यांच्या मदतीने वर्ग चालू केले. प्रेरकांना आवश्यक साहित्य देण्यात आले आहे. पालकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे पालकांकडे अँड्रॉइड फोन नसल्याने त्यांचे पाल्य ऑनलाईन शिक्षणात सहभागी होऊ शकत नाही म्हणून अश्या विद्यार्थ्यांना दर आठवड्यातून एकदा स्वाध्याय कृती पुस्तिका वाटप करून ती सोडून घेतली जाते .पालक या उपक्रमास उत्तम प्रतिसाद देत आहेत तसेच अभ्यास प्रेरकाच्या मदतीने वर्ग सुरू करण्यात आले अभ्यास प्रेरक यांच्याशी संपर्क करून विद्यार्थी प्रगतीबाबत आढावा घेतला जात आहे हा उपक्रम चालू केला याचा मनस्वी आनंद वाटत आहे.
