ऑल इडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाइज असोसिएशन तर्फे लोकशाहीर आण्णा भाउ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व जयंती निमित्त अभिवादन

0

मनमाड -ऑल इडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाइज असोसिएशन तर्फे लोकशाहीर आण्णा भाउ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजित ओपन लाईन कार्यालय येथे करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अशोक (अप्पा) परदेशी,सतिषभाऊ केदारे (अति.झोनल सचिव),प्रदिप गायकवाड (अध्यक्ष,ओपन लाईन), राहुल पगारे, हिरामण मनोहर (पत्रकार),प्रविण आहीरे (सचिव कारखाना शाखा) आदी उपस्थित राहणार आहे.संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोठे आहे, अण्णाभाऊ साठे,अमर शेख शाहीर गव्हानकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ खेड्यापाड्यात पोहोचली,आज महाराष्ट्र सरकार वतीने अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष पाहिजे त्या प्रमाणात साजरे केले जात नाही ही खेदाची बाब आहे असे प्रतिपादन अशोक (अप्पा) परदेशी यांनी या वेळी केलं.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतिष भाऊ केदारे यांनी केलं तर सुत्रसंचलन शरद झोबाड यांनी केलं तसेच आभार रत्नदिप पगारे यांनी केलं.यावेळी इंडिया हास्कुल मधील दहावीच्या परीक्षेत शाळेत पहील्या तीन आलेल्या मुलीचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सिध्दार्थ जोगदंड (कार्याध्यक्ष कारखाना शाखा), विजय गेडाम (खजिनदार कारखाना शाखा) रत्नदिप पगारे (सचिव ओपन लाईन शाखा), रमेश पगारे (अति.सचिव कारखाना शाखा), संदिप पगारे (वरिष्ठ उपाध्यक्ष), सागर गरूड (उपाध्यक्ष), सुभाष जगताप (उपाध्यक्ष), सुनील सोनवणे अर्जून बागुल,सागर साळवे,विनोद खरे,अजित जगताप, राहुल केदारे, सुभाष खरे, सचिन इंगळे, संदिप पगारे, आदी न केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here