लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने साजरी

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु.मा.बी एल बैरवा साहेब (जयपूर),ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे राष्ट्रीय महामंत्री आयु.मा.अशोककुमार साहेब (दिल्ली) असोसिएशन चे राष्ट्रीय अती.महामंत्री मा..बी.के. खोइया साहेब (मुंबई),झोनल कार्याध्यक्ष या.हेमंत जाधव साहेब (मुंबई) आदी ने चर्चात सहभाग घेतला.मा.राष्ट्रीय अध्यक्ष आयु. बी.एल.बैराव साहेब यांनी आपल्या भाषणात म्हणाले,”पंडित नेहरू साहेब रशियाच्या दौऱ्यावर गेले असता त्यांना अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल विचारले असता ते चकित झाले होते.अण्णाभाउ साठे यांची किर्ती संपूर्ण जगात आहे.अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य नव्याने प्रकाशित करून ते नवीन पिढी पर्यत पोचण्यासाठी व अण्णाभाऊ साठे यांचा उचित सन्मान होण्यासाठी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन तर्फे महाराष्ट्र सरकारला व केद्र सरकारला निवेदन देण्यात येईल.तसेच राष्ट्रीय महामंत्री मा.अशोक कुमार साहेब यांनी आपल्या भाषणात म्हणाले”अण्णा भाऊ साठे यांच साहित्य रशिया व युरोपातील काही देशांमध्ये शिकवले जाते पण भारतातील मोजक्या च विद्यापीठ मध्ये शिकवले जात. ते संपुर्ण भारतात शिकवले जावे या, करिता भारत सरकारला असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात येईल.तसेच प्र नवी शिक्षण धोरणामध्ये अण्णा भाऊ साठे यांचे साहित्यातील काही भागाचा समावेश प्राथमिक व माध्यमिक स्तरावर समावेश करण्यासाठी. असोसिएशन तर्फे केद्र व राज्य सरकार कडे पाठपुरावा करण्यात येईल.व अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नवीन विद्यापीठ महाराष्ट्र सरकार ने स्थापन करावे अशी मागणी केली”कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन सतिष भाऊ केदारे अति.झोनल सचिव यांनी केले.यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावरील व साहीत्यावरील प्रश्न असलेल्या ऑनलाईन प्रश्न मंच प्रतियोगिता स्पर्धेच उद्घाटन आयु.बी.एल.बैरवा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. मिलिंद देहाडे (नाशिक),निकेश उके (नागपूर),प्रविण आहीरे, सिध्दार्थ जोगदंड,विजय गेडाम, सुभाष जगताप, सागर साळवे, सचिन इगळे, रमेश पगारे,दिपक अस्वले,कल्याण धिवर, अर्जून बागुल, प्रदीप गायकवाड, रत्नदिप पगारे, अजित जगताप आदी या वेळी ऑनलाईन उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड शाखा ने केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here