सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) दिनांक 31/ 07/ 2020 रोजी समूह साधन केंद्र आमठाणा अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या दिनांक 01/08/2020 पासून सुरु होणाऱ्या ऑनलाइन वर्गाबाबत उद्बोधनपर आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत प्रथम या कार्यक्रमाचे श्री चव्हाण सर यांनी प्रास्ताविक केले. व अंभोरे सर यांनी आजच्या बैठकीत विषयी थोडक्यात पण सविस्तरपणे आपले विचार व्यक्त केले त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख श्री कुंभारे सर केंद्रप्रमुख आमठाणा.#SERVICE TO MAN IS SERVICE TO GOD#या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये देव शोधणारे व विद्यार्थी हाच अग्रस्थानी मानणारे श्री कुंभारे सर यांनी आजच्या या बैठकी विषयी खूपच सखोल आणि सविस्तर असे मार्गदर्शन केले.
यानंतर अब्दुल कादिर सर यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत शिक्षक कार्याची माहिती पीपीटीसह खूपच छान मार्गदर्शन केले.
त्यानंतरश्री वानखेडे सर घाटनांद्रा, श्री धनाड सर, श्री मोरे सर,श्री खेळवणे सर, श्री तडवी सर, श्रीनागरगोजे सर, व बरेच सहकारी शिक्षक यांनी आपले विचार व्यक्त केले.
तसेच शेवटी श्री आदरणीय पेडगावचे तंत्रज्ञ शिक्षक श्री वानखेडे सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.🙏🙏🙏🌹🌹