सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण साजरा होणार आहे.बकरी चा उत्सव साजरा करताना नागरिकांनी शासनाद्वारे निर्गमित निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ईद अत्यंत साधेपणाने घरीच साजरी करावी जेणेकरून सध्याच्या कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीला आळा बसेल.
बकरी ईद हा सण साजरा करताना माननीय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील औरंगाबाद ग्रामीण यांनी आवाहन केले आहे की सध्या कोविड १९ विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीमुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी हा सण उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा.जनावरांचा बाजार भरण्यास बंदी करण्यात आलेली असल्यामुळे नागरिकांना जनावरे खरेदी करायची असल्यास ऑनलाइन पद्धतीने किंवा फोनच्या माध्यमातून जनावरे खरेदी व विक्री करावी.बकरी ईदची नमाज ही ईदगाह,मस्जीत किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरीच ईदची नमाज अदा करावी तसेच याबाबत परिसरातील नागरिक व नातेवाईक यांनासुद्धा साध्या पद्धतीने घरीच ईद साजरी करणेबाबत प्रेरित करावे.या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी कुठलीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकञीत जमू नये ज्यामुळे या संसर्गाचा फैलाव होण्यास मदत होईल याची खबरदारी घ्यावी. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी या परिस्थितीला न घाबरता किंवा मनात कोणतीही भीती न बाळगता प्रत्येकाने वैयक्तिक खबरदारी घेतल्यास याचा संसर्ग व फैलाव टाळू शकतो.तसेच माननीय जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश जिल्ह्यात लागू करण्यात आलेले आहे.
या कायद्याचे उल्लंघन किंवा कायदा मोडणा-या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज भावना भडकावणारे प्रक्षोभक धार्मिक भावना दुखावणारे लिखाण प्रसारित करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. याबाबत सायबर पोलीस टीम सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या पोस्टवर सतर्क पणे लक्ष ठेवून आहेत. अशा असामाजिक तत्त्वाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा इशारा सुद्धा यावेळी माननीय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे समाजातील महत्त्वाचे मुक्ती आलीम हाफीज मौलवी इत्यादी धर्मगुरू,लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी यांच्या सहभागाने शांतता मोहल्ला समितीच्या एकूण ८३ बैठका घेण्यात आलेल्या आहेत.तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ०६ शांतता समितीची असे एकूण ८९ बैठका घेण्यात आलेल्या आहेत. सोशल डिस्टंसिग व फिजिकल डिस्टंसिग तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करून या बैठका मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी नागरिकांशी संवाद साधून ईद साजरी करणे बाबत घ्यावयाची काळजी बाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पोलिसांचे पथसंचलन पोलीस ठाणे पैठण दोन,कन्नड शहर एक, खुलताबाद तिन,सिल्लोड शहर दोन सिल्लोड ग्रामीण चार, चिखलठाणा एक, पाचोड एक, गंगापूर एक,पिशोर एक ठिकाणी करण्यात आले आहे. याचप्रमाणे सीआरपीसी कलम १०७ अन्वये १७४ कलम १४९ अन्वये ७९ व्यक्तीविरोधात आजपर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Home Breaking News शासनाद्वारे निर्गमीत सूचनांचे पालन करून नागरिकांनी घरीच ईद साजरी करावी- मोक्षदा पाटील...