मनमाड ( हर्षद गद्रे ) रोटरी इंटरनॅशनल ही जागतिक पातळीवरील सेवाभावी संस्था असून मनमाड शहरात मनमाड रोटरी क्लब गेल्या सत्तर वर्षापासून सेवाभावी प्रकल्प राबवित आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या शाळा बंद पण शिक्षण मात्र सुरू या घोषवाक्याला अर्थ देण्यासाठी रोटरी क्लब मनमाडने शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी साठी पाऊल उचलले आहे.
रोटरी क्लब TEACH नावाचा कार्यक्रम राबविला जाणार असून या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांना सहय्यभूत ठरतील अशी कौशल्ये विकसित करण्यासाठी रोटरी क्लब मनमाड डिजिटल कौशल्य प्रशिक्षण दि03/08/2020 ते 09/08/2020 ह्या कालावधीत घेणार आहे .
पाच दिवसांच्या या प्रशिक्षण सत्रात 15 माहिती-तंत्रज्ञान कौशल्यांची ओळख शिक्षकांना करून दिली जाणार आहे. रोज तीन याप्रमाणे पाच कौशल्य शिक्षकांत विकसित केली जाणार आहेत. अशा प्रकारचा हा कार्यक्रम रोटरीने विकसित केला असून सहाव्या दिवशी पाच दिवसाच्या प्रशिक्षणावर आधारित सराव घेतला जाणार आहे तर सातव्या दिवशी संपूर्ण प्रशिक्षणावर आधारित छोटी चाचणी घेतली जाईल. सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
आगामी काल हा दूरस्थ शिक्षणाचा काळ आहे. तेव्हा शिक्षक बंधू-भगिनींनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शिक्षकांनी स्वतः तंत्रस्नेही व्हावे. अधिक माहितीसाठी क्लबचे प्रोजेक्ट चैरमन श्री. सुभाष गुजराथी सर ,मो. 9422921246 अध्यक्ष श्री. लौकुमर माने , मो. 9423962028 सचिव श्री. आनंद काकडे मो. 9960153187 व स्वप्नील सूर्यवंशी मो. 9860360610 यांचेशी संपर्क साधावा .