लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा खा. डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न.

0

मनमाड ( प्रतिनिधी :हर्षद गद्रे ) लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व लायनेस क्लब ऑफ मनमाड सिटीचा पदग्रहण सोहळा खा. डॉ. भारती पवार, लायन्सचे उपप्रांतपाल ला. राजेश कोठावदे, ज्येष्ठ कॅबिनेट ऑफिसर ला. जे पी जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्ष म्हणून ला. डॉ. सागर कोल्हे व लायनेस क्लबच्या अध्यक्षा म्हणून लायनेस वैशाली वाणी यांनी शपथ घेतली. व्यासपीठावर रिजन चेअरमन ला. राजेंद्र पगार,झोन चेअरमन ला. अशिष झंवर, लायनेस क्लबच्या डिस्ट्रिक प्रेसिडेंट साधना पाटील उपस्थित होत्या.
लायन्स व लायनेस क्लबच्या अध्यक्षांसह सचिव म्हणून ला.डॉ निलेश राठी व लायनेस रेखा येणारे तर खजिनदार म्हणून ला. चंद्रकांत मेंगाने व लायनेस कविता पाटेकर यांनी शपथ घेतली. लायन व लायनेस परिवारात वीस नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली.
लायन्स क्लबने यावर्षीपासून लायन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यास सुरुवात केली असून या पहिल्या पुरस्काराचे मानकरी मनमाड शहरातील नुकतेच निधन पावलेले ज्येष्ठ डॉक्टर सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील उत्तम व्यक्तिमत्त्वाचे धनी मनमाड शहराचे माजी उपनगराध्यक्ष कै. डॉ. सी एच बागरेचा व लायन्स क्लबचे संस्थापकीय अध्यक्ष उद्योजक ,माजी नगरसेवक कै. इंदरचंद चोपडा यां दोघाना मरणोत्तर देण्यात आला. पुढील वर्षीपासून नियमितपणे लायन्स क्लब मार्फत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कोविड संक्रमण काळात उत्तम प्रकारे जनजागृती केल्याबद्दल पत्रकार नरेश गुजराथी व स्वाती गुजराथी यांचा देखील सन्मान करण्यात आला.
खा. डॉ. भारती पवार यांनी लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक करून सदैव लायन्स क्लबच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासन दिले. उपप्रांतपाल ला.राजेश कोठावदे यांनी क्लबच्या पस्तीस वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ कॅबिनेट ऑफिसर ला.जे पी जाधव यांनी लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व आपल्या क्लबचा ऋणानुबंध विशद करून नूतन सदस्यांना शपथ प्रदान केली व क्लबच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ला. अविनाश पारखे यांनी केले सूत्रसंचालन ला. हर्षद गद्रे ला. संगीता कदम यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय ला. डॉक्टर शांताराम कातकडे, ला. डॉक्टर अर्चना राठी, ला. एडवोकेट शशिकांत व्यवहारे यांनी करून दिला. ला.डॉ. निलेश राठी यांनी आभार मानले. याप्रसंगी मागील वर्षीच्या पदाधिकाऱ्यांचा क्लब मार्फत भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here