शाळा मुलांच्या दारी जि.प.शाळा सपकाळ वाडी केळगाव येथील अभिनव उपक्रम

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील सपकाळवाडी (केळगाव)येथील हा अभिनव उपक्रम ही शाळा अतिशय अतिशय दुर्गम आणी डोंगरदर्‍यात वसलेली एक वस्तीशाळा आहे लाॅकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षण देणार कसे सर्व गोरगरीबाची मुलं जवळपास 50% पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत ज्यांच्याकडे आहेत त्यांना नेट रिचार्जसाठी पैसे नाहीत,या परिस्थितीवर मात करण्यासाठी या शाळेतील शिक्षक श्री.अशोक शिंदे व श्रीमती.लक्ष्मी कोल्हे यांनी एक अभिनव उपक्रम करण्याचे ठरवले तो उपक्रम असा कागदावर प्रत्येक विषयांच्या कूतिपत्रीला तयार करुन झेराॅक्स काढून,प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष घरी जावून कोविड 19 च्या नियमानुसार सोशल डिस्टंगशीन च्या नियमाचे पालन करुन त्यांना कसे सोडवावे यांचे मार्गदर्शन केले, त्यानंतर पुढील आठवठ्यात पुन्हा पुढील कुतीपत्रीका देतांना आधीची सोडवलेली कूती पत्रीका परत घेणे चुकांच्या दुरुस्था करणे असा उपक्रम आम्ही आपल्या शाळेत राबवत आहोत ही प्रक्रिया दर आठवड्यात अविस्त चालु आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अतिशय आनंदी वातावरण आहे.

अशी वेळ येईल असे स्वपनातही वाटले नव्हते अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे 100% गरीब बालकाना ऑनलाईन शिक्षण देणे शक्य नाही म्हणून हा कूतीपत्रीकेचा पर्याय समोर झाला या गरीबांच्या मुलांना या काळात सुध्दा शिक्षण देणे शक्य होत आहे यांचा खुप मोठा आनंद मला होत आहे.अशोक शिंदे सर मुख्यध्यापक सपकाळ वस्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here