मा,आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून नाभिक कर्तनालय व्यावसायिकांना पीपीई किट वाटप

0

मनमाड– ( सतिशसिंग परदेशी )  मनमाड येथे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केस कर्तनायल व्यवसाय करणाऱ्या  व्यवसायिकांना पीपीई किट वाटप तसेच गोरगरीब जनतेला अन्नदान वाटप करण्यात आले.शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या वतीने जनतेच्या सेवेसाठी मनमाड शहरातील  कर्तनायल ( कंटीग सलून )धारकांसाठी पीपीई किटचे वाटप करण्याचा कार्यक्रम  आठवडे बाजार येथील संत सेना महाराज समाजमंदिर येथे संपन्न झाला. गोरगरीब जनतेसाठी  वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर  अन्नदानाचा कार्यक्रम  मालेगाव चौफुली येथील  शिवसेना कार्यालय येथे संपन्न. याप्रसंगी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, शहराध्यक्ष मयूर बोरशे, राजेंद्र भाबड, संजय कटारिया, दिनेश केकान, मुन्ना दरगुडे स्वराज देशमुख सचिन दरगुडे प्रवीण धाकराव आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, शहराध्यक्ष मयूर बोरसे, राजेंद्र भाबड, संजय कटारिया, दिनेश केकान, मुन्ना दरगुडे स्वराज देशमुख सचिन दरगुडे प्रवीण धाकराव आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here