
चाळीसगाव – कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे व चाळीसगाव मध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे व लोकांना याचे गांभीर्य दिसत नाही म्हणून चाळीसगाव नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने दि 27 पासून मास्क न लावणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू केली असून जो मास्क लावणार नाही त्यांना 500 रुपये दंड आकारणी सुरू केली आहे. दि 27 पासून ही मोहीम नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने सकाळपासून सुरू करण्यात आली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे स पो नि मयुर भामरे, पो कॉ राहुल गुंजाळ, भुषण पाटील, प्रकाश पाटील व नगरपरिषदेचे कर अधीक्षक अशोक देशमुख,वसंत देशमुख, पंकज शिंदे या मोहिमेत सहभागी झाले होते या पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केल्याने चाळीसगाव शहरात वाऱ्या सारखी बातमी पसरताच लोकांनी मात्र मास्क लावण्यास सुरुवात केली असून अशीच कारवाई सुरू ठेवल्यास कोरोनाला आळा बसू शकतो असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
