श्री.क्षेत्र मुडैश्वर येथे पोलीसाचा बंदोबस्त व श्री.क्षेत्र मुडैश्वर

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :- विनोद हिंगमीरे ) श्रावण महिन्यात त्यात विशेषतः सोमवारी महादेवाची मंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलून जातात. परंतु यंदा मात्र कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद व सर्व यात्रा रद्द करण्यात आल्याने पहिल्या श्रावण सोमवारी शिवालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. कोरोनामुळे भक्तांनी ही देवांपासून डिस्टन्स पाळल्याचे चित्र दिसून आले. यात मात्र पानफुल, बेलपत्र, नारळ विक्री करणाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला आहे.  हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. या पवित्र महिन्यात सर्वच देवदेवतांच्या विशेषतः महादेवाची मंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलून जातात. यंदा मात्र कोरोनामुळे पहिल्या श्रावण सोमवारी शिवालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला.अजिंठा डोंगररांगेत सात हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. सिल्लोड शहरात पुरातन हेमाडपंथी मंदिर असून महानुभाव पथांचे संस्थापक चक्रधर स्वामी या ठिकाणी थांबले होते असे सांगितले जाते. श्रावण महिन्यात मंदिरात दर्शनसाठी भक्तांची रिघ लागते. केळगावजवळील डोंगरमाथ्यावर प्रभु रामचंद्र यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेले मुर्डेश्वर महादेव मंदिर आहे. राम वनवासात असतांना त्यांनी येथून मागे वळून पाहिले होते. यामुळे मुर्डेश्वर महादेव मंदिर असे नाव प्रचलित झाले, अशी अख्यायिका आहे.श्रावण महिन्यात हिरवाईने नटलेला हा परिसर भक्तांना मोहित करतो.
आमठाणा बिटचे जमादार देविदास जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here