वागदर्डी धरण बनलंय, पिकनिक पॉईन्ट

0

मनमाड : यंदाच्या वर्षी वागदर्डी धरणा मध्ये मुबलक असा पाणीसाठा असल्याने धरण परिसर खुपच निसर्ग रम्य बनलेला आहे , या मुळे धरण परिसरात नागरिकांची येण्याची संख्या देखील वाढलेली आहे.रोज सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांन बरोबरच विशेषतः सुट्टी च्या दिवशी नागरिकांची परिवारा सह येण्याने जणू काही वागदर्डी धरण क्षेत्र हे पिकनिक पाईन्ट बनले आहे असे वाटते . काही दिवसांपासून फ्लेमिंगो पक्षी देखील वागदर्डी धरण क्षेत्रात मुक्कामी असल्याने त्यांना बघण्यासाठी देखील अनेक नागरिक आपल्या परिवारासह धरण परिसरात येत आहे. परंतु मनमाड मध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार बघता नागरिकांनी आपली आणि इतरांची ही काळजी घ्यावी आणि घरातुन बाहेर पडतांना मासचा आणि सोशल डिस्टनसिंग च्या सर्व नियमांचे पालन करावे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here