सिल्लोड ( प्रतिनिधि: विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथिल एकाने दि.२७(मंगळवार) रोजी रात्री राहत्या घरात गळफास घेवुन आपली जीवन याञा संपवली.
मिळालेल्या माहिती नुसार नाना नारायण गव्हाडे(वय-४२)असे आत्महत्या केलेल्य व्यक्तीचे नाव आहे.गव्हान्डे हा मुळ रहिवाशी सिल्लोड येथिल असून तो मागील दोन वर्षा पासून सासुरवाडीत ह.मु. सारोळा ता.सिल्लोड येथे कुटूबांचा उदारनिर्वाह करण्यासाठी सारोळ्यात मोल मजुरी करून कुटूबांचा उदारनिर्वाह करित होता.परंतु दि.२७(मंगळवार)रोजी राहण्यासाठी भांड्याने घेतलेल्या घरात नाना गव्हान्डे यांनी गळफास घेतल्याची धक्कादायक घटणा घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी धाव घेतली, घटना पाहताच नागरिक भयभीत झाले.तात्काळ घडलेल्या घटनेची माहिती अजिंठा पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनास्थळी अजिंठा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सांडू जाधव,पोलीस पाटील सुधाकर काकडे,ग्रांमपंचायत सदस्य युवराज वराडे, रामचंद्र गोरे यांनी या घटनेची माहिती घेवुन पंचनामा करण्यात आला व नागरिकांच्या मदतीनी मृतदेहास काडुन, सिल्लोड येथिल शासकीय रुग्नालयात शवच्छेदनासाठी मृत देह नेण्यात आला.नाना गव्हान्डे यांच्यावर दि.२८(बुधवार)रोजी दोनच्या सुमारास सिल्लोड येथिल स्मशानभूमीत शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले असा परिवार होत. या घटनेची अजिंठा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.माञ पोलीस प्रशासनाला आत्महतेचे कारण अद्याप पर्यंत कळले नाही. घटनेचा पुढील तपास बिट जमादार सांडू जाधव हे करित करित आहे.