निसर्गरम्य आणि प्राचीन शनिमंदिर

0

वरदडी-  चांदवड तालुक्यातील उसवाड वरदडी येथील निसर्गाने नटलेले अति प्राचीन श्री शनिमंदिर , येथे दर वर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि शनी आमवस्ये च्या दिवशी भविकांची दर्शनाला मोठी गर्दि होत असते , परंतु यंदा मात्र कोरोना विषाणूच्या प्रभावा मुळे यंदा श्रावण महिन्यात मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे . या स्थानाल विशेष असे महत्व आणि तितकाच प्राचीन असा इतिहास देखील आहे. उज्जैन येथील राजा विक्रम यांच्यावर जेव्हा शनी महाराजांचा कोप झाला तेव्हा त्यांनी साडेसात वर्ष वरदडी येथील परिसरात मध्येच सहवास केला होता. राजा विक्रम एके दिवशी घोडा खरेदी करण्यासाठी घोडे बाजारात गेले असता तेथे शनी महाराज देखील आपले रूप बदलून घोडे विक्रीसाठी आले होते जेव्हा राजांनी शनी देवांकडील घोडा पसंद करून घेण्याचे ठरवले तेव्हा शनी देवांनी त्यांना घोडा चालवून पाहण्यास सांगितला जेव्हा विक्रम राजा घोडा चालवण्यासाठी घोड्यावर स्वार झाल्यावर उज्जैन वरून घोड्याने उड्डाण करून संध्याकाळी घोड्याने राजास वरदडी येथील घनदाट जंगलात आणून सोडले , आज देखील घोडा जेथे उतरला ती जागा वरदडी येथे बघु शकतो .राजा विक्रम यांनी आपल्या साडेसातीचा काळ वरदडी येथील परिसरात पूर्ण केल्या वर शनी महाराज प्रसन्न होऊन त्यांनी राजा विक्रमास संगितले की या जागेवर येऊन जो कोणी मनुष्य शरण येईल त्याचा साडेसातीचा प्रकोप कमी होईल आणि त्यांना शनी देव प्रसन्न होतील . या ठिकाणी शनी देवांच्या सोबतच राहू आणि केतू या दोन ग्रहांची देखील मंदिरा मध्ये मूर्ती आहे. येथील परिसर धार्मिक महत्वा बरोबरच डोंगर, झाडे आणि पावसाळ्यात छोटे झरे वाहत असल्याने खुपच सुंदर देखील आहे.
आज आपण वरदडी येथील शनी मंदिर …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here