सतत मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान

0

सिल्लोड (प्रतिनिधी विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालूक्यात गेल्या चार दिवसांपासून सतत तिसऱ्यांदा मूसळधार पावसाने झोडपले आहे या पावसामूळे तालूक्यातील अनेक गावांमध्ये शेकडो एकर जमिनितील पिंकाचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने पिके नेस्तनाबूत झाली आहे तालूक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते पूलही फूटले असून पूलांवर मोठ मोठे खड्डे पडले आहे याबाबत भा ज पा चे तालूका उपाध्यक्ष चंद्रशेखर साळवे यांनी एम सी एनशी बोलतांना सांगितले कि या नूकसानीची आम्ही पाहणी केली असून शेतकऱ्यांचे या नूकसानीमूळे कंबरडे मोडले आहे एकीकडे कोरोणाचे थैमान घातल्याने अगोदरच महागाईच्या खायेत लोटलेला शेतकरी उभा राहत नाही तोच दूसरीकडे पावसाने थैमान घालत मोठे नूकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे या बाबीचा विचार करून शासनाच्या वतीने तहसिलदार सिल्लोड यांनी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्यामार्फत नूकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणीही चंद्रशेखर साळवे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here