मृत्यू झालेला व्यक्ती खरेदी लिहून देतो तेंव्हा!भ्रष्ट्राचाराचा कळस

0

नांदगाव – खरेदी – विक्री म्हटलं की पैश्यांची देवाण घेवाण हे सर्वपरिचित आहे.एकमेव असे कार्यालय कि जेथे दिवसाढवळ्या दलालांमार्फत हाजारोंची देवां घेवाण होते अन तीही अगदी राजीखुषीने…नांदगाव तालुक्यात काल्पनिक कथा वास्तवात अर्थात मृत्यू झालेल्या व्यक्तीने आपली मालमत्ता दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दुसऱ्याला खरेदी करून दिल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव येथील विठ्ठल सुखरचंद मोरे हे इसम 29 जून 2001 रोजी मयत असून त्यांच्या नावाची मालमत्ता चक्क 2019 मध्ये विकली गेली असून त्यात त्यांचे आधार कार्ड सोबत ओळखतो म्हणून साक्षीदार अशी व्यक्ती असे खरेदीदस्त झाले आहे.याबाबत माहिती मिळविली असता सदर खरेदी करुन देणाऱ्या नावाचा इसम तर 2001 मधेच मृत्यू पावला आहे मग या खरेदीतील इसम नक्की कोण?असे नक्की झाले कसे?मृत व्यक्तीच्या नावावरील मालमत्तेची खरेदी होते,सिटी सर्वेला नोंद देखील होते!म्हणजे यात सत्यता असेल तर यातील दोषी ठरणारे दुय्यम निबंधक विभागातील अधिकारी,सिटी सर्वे विभागातील अधिकारी,खरेदी करून देणारे/घेणारे!अन दलाल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर 420 प्रमाणे गुन्हे दाखल होऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केल्यास असा भ्रष्ट्राचार पुन्हा होणार नाही अन खरेदी विक्री विभागातील दलाली देखील बंद होईल असे सुज्ञांकडून चर्चिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here