
सिल्लोड ( प्रतिनिधी- विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील वांगी खुर्द येथे शुक्रवारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने कपाशी मका मिरची आधी पिके ही वाहून गेली आहे तर काही शेतकऱ्यांच्या शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे वांगी खुर्द येथील विशाल पाटील मुरकुटे मित्र मंडळाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ तहसीलदार व वरिष्ठांकडे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे.यावेळी विशाल मुरकुटे,सुभान यासिन पठाण, अंकुश मुरकुटे,श्रीकांत दांडगे,अरूण दांडगे आदी शेतकरी उपस्थित होते.या वेळी विशाल मुरकुटे मित्रमंडळाच्या वतीने तहसीलदार व वरिष्ठांना पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
