माटुंगा – बंदोबस्त करत असताना एक 14 वर्षाचा मुलगा आला आणि विचारलं साहेब चहा घेणार का ? कारोना सारख्या महामारीचा विचार करून आधी वाटल हा कोण ? कसा आहे चहा कसा बनवला असेल मन्हुन त्याला नाही सांगितले. पण नंतर समजले नाही मनात काय विचार आला , त्याला बोलवून घेतले सहज विचारलं बाळा नाव काय तुझ सागर माने अस नाव सांगून त्याने नकळत अंगावर असलेल्या वर्दी कडे बघितल त्याला विचारले बाळा चहा का विकतोस तर त्याने सांगितले २९ मार्च ला वडील वारले त्यांचं चहा च कॅन्टीन होत आता पर्यंत जितकं कमवल होत तितकं सगळ संपल घरात आई आणि मी आई आजारी असते त्या मुळे मीच चहा बनवून विकतो आणि रोज २०० रुपये मिळवतो कारण आता शाळा चालू झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत घर भाड द्याच आहे अस बोलून तो गप बसला..त्याला विचारल तुला पुढे शिकायचं आहे का तर पटकन बोलला तुमच्या सारखं पोलीस होयच आहे .. त्या वेळेस कोणत्या ही प्रकारचा विचार न करता आई वडिलांनी ज्या प्रकारे संस्कार केलेले त्या प्रकारे त्याला १० वी ची पुस्तके व वह्या घेऊन दिल्या व त्यांना नंबर देऊन सांगितलं अभ्यसा साठी कोणतीही अडचण आल्यास संपर्क कर इतके बोलुन त्याच्या कडचा चहा घेतला.
कारण त्याची जिद्द आणि स्वप्न या दोन गोष्टी कोरोना पेक्षा जास्त महत्वाच्या होत्या इतके बोलुन त्याला धन्यवाद केले व पुढील येणाऱ्या भावी काळा साठी त्याला शुभेच्छा दिल्या.