सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांचा कोविड रुग्णांना आधार देण्याचा सिलसिला सुरूच!

0

( पनवेल- प्रतिनिधी ) कोविड आजारापेक्षा उपचार भयंकर आणि त्यातही बिलाचे आकडे महाभंयकर असल्याने अनेकांचा थरकाप उडत आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना कांतीलाल कडू आशेचा किरण ठरत आहेत. त्यांनी काल पुन्हा एकदा एका रुग्णाला चक्क 73 हजार रुपयांची बिलात सूट देण्यास डॉक्टरांना प्रवृत्त केले. तेव्हा रुग्ण आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आभाळाइतके हसू खुलले…!उरण पूर्व भागातील एक रुग्ण कोविडच्या उपचारांसाठी नवीन पनवेल येथील रुग्णालयात उपचार घेत होता. दोन तीन दिवसात बाहेरून औषधांना होणारा खर्च, हॉस्पिटलला अनामत रक्कम म्हणून टाकावे लागणारी रक्कम असे महागडे उपचार परवडत नसले तरी जीव वाचविण्यासाठी नातेवाईक आटापिटा करून वेळप्रसंगी उसनवारी घेऊन उपचार करून घेताना दिसत आहेत.
त्यात या रुग्णांचा खर्च साडेतीन लाख रुपयांचा आकडा ओलांडून पुढे गेला होता. बिल भरण्याची साहजिकच चिंता वाढली. रुग्णाचे जावई संजय कोळी यांना त्यांच्या बहिणीने सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांचा फोन नंबर दिला अन चक्रे वेगाने फिरली…!
कडू यांनी ताबडतोब त्यांच्या परिचित सहकाऱ्याकडून संबधित डॉक्टरांना निरोप पाठविला आणि एका झटक्यात डॉक्टरांनी त्या कोविड रुग्णाला बिलाच्या रकमेत 73 हजारांची घसघशीत सूट दिली.कडू यांचा कोविड रुग्णांना मदत करण्याचा जो सिलसिला सुरू आहे, त्याचा अनेकांना लाभ होत असल्याने रुग्ण, नातेवाईकांना त्यांचा मोठा आधार ठरत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here