चोरटी वाळू जोमात प्रशासन कोमात….

0

नांदगाव ( निखिल मोरे ) कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्यामुळेराज्यात वाहतूक पुर्णपणे बंद आहे. मात्र तालुक्यात वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कामकाजाबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते.कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर तालुक्यात वाहतूक पुर्णपणे बंद आहे. मात्र तालुक्यात वाळूची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून महसूल प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.दरम्यान, तालुक्यात वाळूचे ठेके बंद असताना मुळडोंगरी ,मन्याडनदी,काही फॉरेस्ट विभागाच्या मधून दररोज पंधरा ते वीस ट्रॅक्टर मधून वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असताना महसूल प्रशासनाने याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून वाळूचा बेकायदा उपसा सुरू असून यात स्थानिक व व बाहेरील व्यक्ती असल्याचे वारंवार उघड झाले आहे. या वाळू चोरांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा करण्यात येत आहे. मात्र याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा उपाययोजनांंमध्ये व्यस्त असल्याने वाळू माफियांचे फावते.
दरम्यान, आज रोजी जुन्या तहसील कार्यालयात क्रमांक एम.एच.18 बी.जी.8971 वाळूने भरलेला ट्रक लावण्यात आला आहे.महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले की,ट्रक चालकाकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे अथवा वाळू वाहतूकीचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे.वाळू भरलेला ट्रक चालकावर काय?कारवाई होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here