रोहित ( फ्लेमिंगो) पक्षांचे वागदर्डी धरण येथे आगमन …

0

मनमाड – रोहित हा पाणथळ जागी थव्याने राहणारा फिनिकोपटेर्स जातीतील पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहिताची पिसे गुलाबी रंगाची असतात. या मुळे याला अग्निपंखी असेही म्हणतात.रोहित पक्षाच्या प्रमुख सहा जाती आहे या पैकी अमेरिकेत चार आणि आफ्रिका , युरोप व आशिया येथे दोन प्रजाती आढळतात. रोहित पक्षी दरवर्षी खुप मोठ्या प्रमाणात अनेक किलो मीटर चा प्रवास करून भारतात स्थलांतरित होत असतात , भारतातील अनेक पाणवठे , दलदलीची प्रदेश या ठिकाणी रोहित पक्षी खुप मोठ्या प्रमाणात आपला मुक्काम करत असतात . नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर या पक्षी अभयआरण्यात देखील दरवर्षी हे पक्षी येत असतात .काही वर्षांपासून मनमाड येथील वागदर्डी धरणात देखील रोहित पक्षी येत आहे, या वर्षी देखील हे परदेशी पाहुणे आपल्या वागदर्डी धरण क्षेत्रात मुक्कामी आलेले आहे.
आज रोहित (फ्लेमिंगो) पक्षांचे छायावृत्त पाहुया….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here