फर्टीलायझर कृषी विक्री केंद्र धारकास विक्री बंदी

0

नांदगाव।दि.४ (प्रतिनिधी -निखील मोरे ) शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या,अनियमितता विक्री, साठ्याचा हिशोब लागू नये म्हणून कंपनी निहाय साठा न ठेवता ताळमेळ ठेवलेला आढळला नाही .खत असून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मनमाड येथील सानप फर्टीलायझर या कृषी विक्री केंद्र धारकास विक्रीबंदी करण्यातअसल्याची माहिती प्रभारी कृषी विकास अधिकारी माधुरी गायकवाड यांनी दिली.मनमाड शहरातील आनंद फर्टीलायझर या कृषी विक्री केंद्रात देखील अनियमितता आढळून आलेली आहे सध्या शेतकरी युरियाची मागणी करत असताना काही शेतकऱ्यांना 20 ते 25 गोण्या, खत विक्री करून त्यांना प्राप्त झालेल्या 12 टन साठा मध्ये नोंदवता व अनियमितपणे विक्री केलेली आढळली . साठ्याचा हिशोब लागू नये म्हणून कंपनी नीहाय साठा न ठेवता ताळमेळ ठेवलेला आढळला नाही . याकरिता सदर केंद्रधारकांना विक्री बंद आदेश दिला आहे. त्याच प्रमाणे सदर विक्री केंद्रात खतांची साठवणूक न करता इतर ठिकाणी केलेली आढळली यामुळे सदर विक्री धारकास त्यांचा परवाना रद्द करण्या बाबत पुढील कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे. याच प्रमाणे इतर दुकानां मध्ये देखील तपासणी सुरू केली आहे . याकरिता सर्व कृषी विक्री धारकांनी शेतकऱ्यांची गैरसोय न होऊ देता खते विक्री करावी अन्यथा शेतकऱ्यांची गैरसोय करणाऱ्या व चुकीचे काम करणाऱ्या विक्री धारकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबी प्रभारी कृषी विकास अधिकारी माधुरी गायकवाड यांनी दिली.याप्रसंगी कृषी अधिकारी पंचायत समिती सुरेश चौधरी , तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, मंडळ कृषी अधिकारी वसंत नागरे, कृषी सहाय्यक गणेश जाधव ,रवी अहिरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here