मतमोजणीच्या धामधुमीत डॉ भारती पवार यांची माणुसकी पाहून शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

0

नाशिक : मतमोजणीच्या धामधुमेकडे दुर्लक्ष करून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रति असलेल्या आपल्या माणुसकीचे आणि कर्तव्याचे दर्शन घडविले निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेले भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे निफाड तालुक्यातील एका शेतात कोसळल्याने झालेल्या अपघातात शेताचे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले त्याचबरोबर वीज वाहक तारा तुटल्या सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही लढाऊ विमानातील दोन्ही वैमानिकांनी पॅराशुट च्या साह्याने विमानातून आपली सुटका करून घेतली निफाड तालुक्यातील या घटनेची माहिती मिळताच डॉक्टर भारती पवार यांनी संबंधित शेतकऱ्याच्या शेताकडे धाव घेऊन बचाव कार्याची माहिती घेतली त्याचप्रमाणे शेतातील झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन संबंधित शेतकरी परिसरातील नागरिक आणि संरक्षण विभागाचे तंत्रज्ञ शासकीय अधिकारी पोलीस यांच्याशी चर्चा करून अपघाताबद्दल उपाययोजना बाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये आवश्यक ती मदत मिळवून देण्याबद्दल आश्वासन देऊन धीर दिला ऐन मतमोजणीच्या दिवशी घडलेल्या या अपघाती प्रसंगांमध्ये दाखविलेल्या माणुसकीच्या दर्शनाबद्दल शेतकऱ्यांनी डॉ भारती पवार आणि भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असल्याच्या विरोधकांचा प्रचार चुकीचा असल्याचे बोलून दाखवले.यावेळी भागवत बाबा बोरस्ते,यतीन कदम, बापू पाटील सह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here