वागदर्डी धरणात पाणी पोहोचले लवकरच शहराला पाणीपुरवठा होणार

0

मनमाड : पालखेड डावा कालव्यातून मनमाड शहराकरिता सोडण्यात आलेल्या पाण्याच्या आवर्तनाचे पाणी काल रात्री अकराच्या सुमारास पाटोदा वरून वाघदर्डी धरणात पोहोचले आहे.आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड शहरातील नागरिकांसाठी पाण्याची तीव्र टंचाई ची परिस्थिती पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना कळवली होती व लवकरात लवकर पाणी मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालखेड डाव्या कालव्यातून पाणी पाटोदा व पाटोदा वरून काल रात्री वागदर्डी धरणात पोहोचले.आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सतत मनमाडकर यांच्या पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून पाणी मिळवून घेतले आहे. मनमाड करांची महत्त्वकांक्षी योजना करंजवण पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल चे काम अतिशय वेगात सुरू असून लवकरच ते पूर्ण होत आहे, सोबतच जलशुद्धीकरण केंद्र, शहरअंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकी यांचे कार्य प्रगतीपथावर सुरू आहे.आमदार सुहास अण्णा कांदे सुरू असलेल्या प्रत्येक कामांवर बारीक लक्ष देऊन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here