मांडवे येथील खून प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या,स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कामगिरीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक

0

अहमदनगर (सुनिल नजन-चिफब्युरो/स्पेशल क्राईम रिपोर्टर/अहमदनगर जिल्हा) ऐन लोकसभा निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत मागासवर्गीय युवक शेतकऱ्याचा शेतातच निर्घृणपणे खून करून आरोपी सहीसलामत पळून जाण्यात यशस्वी झाले होते. राजकीय पक्षाच्या प्रचारात एकमेकांच्या चिखलफेकीत या खूनाच्या झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण नगर जिल्हाच हादरून गेला होता. शेतकरी वर्गात तर प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण झाली होती. अनेक व्यक्तीकडे संशयित म्हणून पोलिसांनी आपल्या नजरा वळविल्या होत्या.खूनाचा तपास लागावा म्हणून म्रुतांच्या नातेवाईकांचा आक्रोश साऱ्या आसमंतात घुमत होता. कोणत्याही प्रकारचे धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी केलेल्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. “कानून के हात बहोत लंबे होते है” हे अहमदनगर जिल्हा पोलिसांनी सिद्ध केले आहे.दि.४/५/२०२४ रोजी अविनाश बाळू जाधव हा त्याच्या घरासमोरील पडवीत झोपला असता त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्ती ने धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून निर्घृणपणे खून केला होता.मयताचे भाउ महेश बाळू जाधव यांनी याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ४८६/ २०२४ कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक राँकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेत्रुत्वाखाली एक टीम तयार करून त्यांच्या वर ही तपासाची जबाबदारी सोपवली होती. या टीममध्ये पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे,पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डिले, सुरेश माळी, संदिप चव्हाण, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, फुरकान शेख,मेघराज कोल्हे,चंद्रकांत कुसाळकर यांचा समावेश होता.या टीमने मांडवे ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे गावात जाउन तपास केला. हे घर कौडगाव आणि मांडवे या दोन गावाच्या सिमेवर होते.या गावात अविनाश जाधव याचे कोणाबरोबर वाद होते का याची चाचपणी केली असता अमोल नवनाथ आठरे रा.कौडगाव ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर याचे नाव पुढे आले.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की अविनाश जाधव याने मला गांजा पिण्याचे व्यसन लावले होते. तो सतत मला दारू आणि गांजा या साठी पैशाची मागणी करीत होता.तसेच माझे घरचे लोक सुदधा आम्हा दोघांना व्यसनामुळे रागावून बोलत होते. दि.१/५/२०२४ रोजी अविनाश जाधव याने माझे वडील हे तिसगाव येथे दुधविक्री करत असलेल्या ठिकाणी जाउन तेथील दुधाचे कँन सांडून देऊन हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली होती. याचा जाब मी अविनाशला विचारला असता त्याने मलाही शिविगाळ करीत धमकी दिली होती. मग मी दिनांक ४/५/२०२४ रोजी रात्री १२ ते १च्या दरम्यान मी आमच्या घरून उस तोडण्याचा कोयता घेऊन गाडीचा आवाज येवू नये म्हणून मी माझ्या कडील इलेक्ट्रीक मोटार सायकल घेऊन गेलो. जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडांची फांदी तोडून घेऊन गेलो होतो. माझी मोटारसायकल घराजवळ लावून मी अविनाशच्या घराकडे गेलो असता अविनाश जाधव हा घरापुढील पडवीमध्ये झोपलेला होता. मी माझ्या जवळील बाभळीच्या काठीने त्याच्या डोक्यात मारले तेव्हा तो उठून बसला. तो नशेत असल्याने त्याला काहीच समजत नव्हते. मी पुन्हा त्याच्या डोक्यात मारले तेव्हा आमच्या दोघामध्ये झटापट झाली. व मला मारण्यासाठी अविनाश काहीतरी हत्यार शोधत होता तेव्हा मी माझ्या गाडीवर ठेवलेला कोयता घेऊन कोयत्याने त्याच्या डोक्यावर व पाठीवर वार केले. तो मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागल्याने मी तेथून पळून आलो असल्याचा कबुली जबाब अमोल आठरे यांनी पोलिसांना लिहून दिला आहे. त्यामुळे संशयित आरोपी नामे अमोल नवनाथ आठरे वय (२०) रा.कौडगाव ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर यास पाथर्डी पोलीस स्टेशनला गु.र.नं.४८६/२०२४ कलम ३०२ प्रमाणे या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलिसांनी ताब्यात घेउन पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर केले आहे.पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे करीत आहेत. सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक राँकेश ओला साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगावचे पोलीस उप अधिक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.दरम्यान मयताची आई अनिता जाधव यांनी एकटा आरोपी हे क्रुत्य करू शकत नाही त्याला अजूनही काही सहभागी आरोपी साथिदार असन्यची शक्यता वर्तविली आहे.अशा प्रकारे मांडवे येथील खून प्रकरणी कोणत्याही प्रकारचा धागादोरा हाती नसताना पोलिसांनी तपास करून संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.पोलिसांचे अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here