एम्.के.एज् प्रस्तुत’म्युझिक मंत्राच्या’संचालिका शर्मिला केसरकर”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

0

मुंबई (गुरुनाथ तिरपणकर)-शर्मिला केसरकर या उत्कृष्ट गायिका आहेत,तसेच म्युझिक मंत्राच्या संचालिका आहेत.त्यांचे बरेच संगीतमय कार्यक्रम(ऑर्केस्ट्रा)मुंबई,ठाणे शहर,उपनगर अशा विविध ठीकाणी झालेले आहेत.मनाचे मनापासून शब्द आणि सुर यांचा अनोखा मिलाप म्हणजे शर्मिला केसरकर यांचा संगीतमय कार्यक्रम.शर्मिला केसरकर म्हणजे एक डायनॅमिक पर्स्न्यालिटी म्हणून सांस्कृतिक विभाग चित्रपट कामगार आघाडीच्या डोंबिवली शहर अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे सांस्कृतिक,सामाजिक व इतर क्षेत्रातील अतुलनीय कार्य लक्षात घेऊन त्यांना जनजागृती सेवा संस्थेचा”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार”संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनी प्रमुख पाहुण्यांचा हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.जनजागृती सेवा संस्थेचा तृतीय वर्धापनदिन नुकताच बदलापुर येथील अजय राजा हाॅल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पुरस्कार स्विकरण्यासाठी शर्मिला केसरकर सहकुटुंब उपस्थित होत्या.त्यांचे सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.त्यांच्या या कार्याबद्दल विवध संस्थांनकडुन सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.म्युझिक मंत्राच्या संचालिका शर्मिला केसरकर यांना जनजागृती सेवा संस्थेचा”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार”मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here