“राजा लोकशाही” येतोय! स्वागताला मतं तयार ठेवा…

0

मुंबई : शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतुन मुक्त झाल्या नंतर भारतात “राजा लोकशाहीचं” शासन आलं अर्थात लोकांचं शासन आलं (जनतेचं).लोकशाही ही एक राजकीय व्यवस्थेची पद्धती आहे, ज्यात सरकार लोकांच्या मतांनुसार निवडून आणि लोकांच्या हिताच्या नियमानुसार काम करते. या पद्धतीत, सरकार लोकांच्या सहमतीनुसार तयार केली जाते आणि लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींचे काम करते. लोकशाहीच्या मुख्य सिद्धांतांमध्ये सर्वांचे समान अधिकार आणि लोकांच्या सहमतीवर आधारित निवडणूका येतात.आशा या “राजा लोकशाहीचं” आगमन लवकरच देशभरात लोकसभेच्या निवडणुकीच्या स्वरूपात होणार आहे. तरी देशभरातील सर्व जनतेला “राजाच्या” स्वागताला आपलं मत तयार ठेवलं पाहिजे. जनतेचं मत हे लाख मोलाचं आहे. शासनाची धुरा कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय लोकांच्या हाती आहे.दूध पितांना मांजर डोळे बंद करून पिते तेव्हा तिने डोळे बंद केले म्हणून जग तिला बघत नाही असा तिचा समज चुकीचा आहे. पंचवार्षिकी मध्ये प्रत्येक नेता, खासदार, वाचाळवीर, किती कार्य करतात, किती आश्वासने देतात, किती दिवे लावतात, याची कल्पना आणि साक्षात अनुभव प्रत्येकच देशाचा नागरिक घेत असतो. चांगली-वाईट परिस्तिथी अनुभवत असतो. पण बहुतांश लोकसंख्या यावर विचार मात्र फारसा करत नाही ही शोकांतिका, आपण शासनासाठी आहे की शासन आपल्यासाठी आहे हेच स्पष्ट समजत नाही आणि मग दुर्लक्षित करतो स्वतःच्या ताकादीला (मताला).मतदानाविषयी जनजागृती झाली पाहिजे, योग्य पात्रतेचे शासनकरते खुर्चीवर बसले पाहिजे, विकासात्मक धोरणांचं तोरण बांधल्या गेलं पाहिजे, देशाला उच्चस्थराचा दर्जा विश्वात मिळाला पाहिजे, असं ज्याला वाटते त्यांनी पुढे आलं पाहिजे, स्वतः सोबतच, कुटुंबीयत, मित्रपरिवारात, वॉर्डात, आपल्या समाजवर्गात, आहे तिथून मतदानाचं महत्व आणि मतदानाची जनजागृतीची चळवळ सुरु ठेवली पाहिजे.तुमचा आजचा निर्णय तुमचच उद्याचं भविष्य ठरवणार आहे. त्याची किंमत अमूल्य आहे. सृजान नागरिक व्हा आणि विवेक बुद्धीचा विचार करा. देशाला घडवण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे. मत द्या ! तुम्ही हुशार आहात ! मत वाया जाऊ देऊ नका…! आता चला लवकर “राजा लोकशाही” येतोय! स्वागताला मतं तयार ठेवा…!

सुराज साधना सुरेश कुटे
(समाज सेवक)
संपर्क : +91 7021264578
(दि.16 मार्च 2024)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here