सरपंच पतीच्या गावात उचापती ग्रामपंचायती मध्ये पत्रकारावर हल्ला,पत्रकार संरक्षण कायद्याअन्वये पोलिसात गुन्हा दाखल

0

प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा – अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मीरी ग्रामपंचायती
च्या मासिक मिटिंगमध्ये बातमीचे व्रुतांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार सचिन नन्नवरे व अतिश नंनवरे या दोघांना सरपंच सौ निता मिरपगार यांचे पती रविंद्र उर्फ काळू गुलाब मिरपगार यांनी अश्शील भाषेत शिविगाळ करत बेदम मारहाण करून शुटिंगचे साहित्य हिसकावून घेत ग्रामसेवक शंकर पातकळ यांना म्हणाला की मिटींगमधिल पत्रकार आणि सदस्य नसलेल्या व्यक्तींना बाहेर काढा.काही लोक बाहेर गेले असता सरपंचपती रवींद्र मिरपगार यांनी पत्रकार नंनवरे यांची गचांडी धरून म्हणाला ग्रामपंचातीच्या विरोधात बातमी दिली तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. रवींद्र हा स्वतः ग्रामपंचायत सदस्य नसताना बेकायदेशीररित्या मासिक मिटींगमधे ग्रामसेवकाने का बसू दिले हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावात महिला पदाधिकारी यांच्या या नवरेशाहीने अनेक पदावर अतिक्रमण करत लोकशाही मोडीत काढली आहे.सरकारने या बोगसगिरी करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याने वेसन घालन्याची वेळ आली आहे.याबाबत पाथर्डी पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता कलम 323, पत्रकार संरक्षण कायदा२०१७ व २०१९ चे क्र.२९ चे कलम ४ प्रमाने आणि भादवि कलम ५०४/५०६/३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या आदेशानुसार पाथर्डी पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ.शिवनाथ बडे यांनी घटनास्थळी जाऊन त्वरित पंचनामा केला आहे. महाराष्ट्र राज्याचे उर्जा, आदिवासी, शालेय शिक्षण मंत्री ना.प्राजक्त दादा तनपुरे यांनी आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिले आहेत. पाथर्डी तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष हरिहर गर्जे, पत्रकार सुनिल नजन,सोमनाथ बोरुडे,नारायण पालवे,संदिप शेवाळे, अमोल कांकरिया,संतोष नंनवरे यांनी आरोपी विरोधात कठोरपणे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here