रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडीया(आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी च्या वतीने लाॅक डाउनच्या काळातील 4 महिण्याचे लाईट बिल माफ करावे

0

मनमाड-दि. 4/7/2020 रोजी रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडीया(आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी च्या वतीने तिव्र निदर्शनेMSEB ऑफिस fci रोड येथे करण्यात आली, लॉक डाऊन काळामध्ये जनतेला कुठल्याही प्रकारचे कामधाम नसून त्याच प्रमाणे काही लोकांनी लाईट बिल भरून सुद्धा त्यांना लाईट बिल सरासरीनुसार जास्त आल्याने सर्वसाधारण नागरिक त्रस्त आहे ,या प्रसंगी सोशल डिस्टससींग ठेऊन मास्क घालुन निदर्शने करण्यात आली, लाॅक डाउनच्या काळातील 4 महिण्याचे लाईट बिल माफ करावे असे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा,वंदेशजी गांगुर्डे यांनी विद्युत अभियंता श्री.काकड साहेब यांना निवेदन देऊन केले,
या प्रसंगी राजाभाऊ सपकाळे,लो.ज.पा संतोष बाकलीवाल जेष्ठ नागरीक महासंघचे अध्यक्ष ,राजाभाऊ निरभवणे संस्थापक अध्यक्ष भिमसेना ,व्यापारी महासंघाचे अनिल गुंदेचा, रवी बनकर,महेंद्र पगारे आदी सह उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here