केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या सामान्य नागरिकांना तीन हजार रुपये रोख स्वरूपात बँक खात्यामध्ये जमा करावे – शेरू भाई मोमीन

0

येवला – लॉकडाऊन मुळे मोलमजुरी करणारा सामान्य नागरिक रिक्षा चालक कष्टकरी मोलकरिन गवंडी बिगारी व अन्य घटकातील माणसाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे म्हणून केंद्र व राज्य शासनाने तात्काळ उपाय योजना लागू करावी जेणेकरून बँक खात्यामध्ये पैसे आल्यानंतर त्यांच्या अडचणी दूर होतील याकरिता तात्काळ पणे शासनाने ठोस भूमिका घेऊन त्वरित आदेश द्यावे सामान्य घटकाला आर्थिक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे जेणेकरून दवाखाने अडीअडचणी साठी मोठा प्रसंग व संताप निर्माण झालेला आहे यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाने जलद गतीने पावले उचलून सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा व तीन महिने वीज बिल माफ करावे नगरपालिका महानगरपालिका केरपट्टी व इतर कर टॅक्स तीन महिने संपूर्णपणे माफ करावे व इतर टॅक्स देखील वीज मंडळ खात्याने देखील तीन महिने वीजबिल तातडीने माफ करण्याचे आदेश द्यावे सामान्य नागरिकांना न्याय द्यावा असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व संबंधित अधिकाऱ्यांकडे स्वाभिमानी सेना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मुस्लिम महासंघ यांच्यावतीने जिल्ह्याचे नाशिक जिल्हाध्यक्ष शेरू भाई सादिक भाई मोमीन यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे निवेदनावर धर्मराज अलगट सोमनाथ काका रोकडे कचरू जानराव अविनाश गिरीगोसावी शेख मकसूद बाबा लूकमान खान समीर सय्यद समीर मनसुरी राजू शेख वसीम अन्सारी सलीम सय्यद मोबीन खान मुलतानी सद्दाम मुलतानी मजीद अन्सारी आदम मोमीन इक्बाल अन्सारी सिद्धीक अन्सारी भूरेखा मुलतानी सलीम मुलतानी रुबाब पटेल इद्रिस मुलतानी संदीप पगारे संतोष गायकवाड राजेंद्र गायकवाड गौतम लाठे आकाश साबळे गणेश खळे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here