
संगमनेर – कीर्तनकार निवृत्ती महाराज यांना 7 ऑगस्ट रोजी कोर्टात संगमनेर कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. इंदुरीकर महाराज यांना बाळाच्या जन्म संदर्भात केलेले वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या विरोधात संगमनेर कोर्टात गर्भधारणा पूर्वी नंतर प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी आज संगमनेर कोर्टात करण्यात आली . प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांना सात ऑगस्ट रोजी अहमदनगर मधील संगमनेर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ते वैयक्तिक रित्या हजर राहून त्यांना जमिनीसाठी अर्ज करावा लागणार इंदोरीकर महाराज यांच्यावर संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल करावा अशी मागणी नोटीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव एडवोकेट रंजना गवांदे अहमदनगरच्या संगमनेर कोर्टात बजावली ,स्त्री संगसम तिथला झाला तर मुलगा होतो व विषम झाला तर मुलगी होते, असे विधान कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी केले होते ,त्यामुळे त्यांच्या विरोधात गर्भधारणा पूर्वी व प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्या नुसार संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भास्कर भवर यांनी दिलेली फिर्याद व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव एडवोकेट रंजना पगार- गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकिस्ता कडे इंदोरीकर महाराज यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती, या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना आदेश दिले होते ,यावर आज पुन्हा सुनावणी करण्यात आली त्यामुळे किर्तनकार इंदोरीकर महाराज यांना सात ऑगस्ट रोजी संगमनेर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
