कळवण तालुक्यातील रवळजी येथील जि.प. प्राथमिक शाळेची भिंत कोसळली

0

कळवण तालुका ( प्रतिनिधी महेश कुवर)- कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची काल भिंत कोसळली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही ,सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अजून शाळा भरविण्याचे आदेश दिले नाहीत त्यामुळे सदर शाळेत एकही विद्यार्थी नव्हता यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा विद्यार्थी असते तर मोठी हानी त्याचप्रमाणे संपूर्ण शाळेची पूर्ण ईमारत अतिशय जीर्ण झाली असून जर चांगला मुसळधार पाऊस पडला तर संपूर्ण इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच शौचालय व मुतारी देखील अत्यंत घाण अवस्थेत आढळून आली मुलांना शौचास जाण्याची कुठलीही व्यवस्था नसून मागील एक वर्षापासुन रवळजी शालेय समितीने ठराव संमत करून संबंधित विभाग व जिल्हा परिषद इमारत व दळणवळण विभागास सदर शाळेत वर्ग न भरविणे व दुसरीकडे पर्यायी व्यवस्था करण्याचा ठराव पाठविला आहे परंतु त्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला आहे. प्रकारामुळे रवळजी गावातील लहान मुले शिक्षणापासून वंचित राहतील असे दिसून येत आहे. तरी या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्याचा इशारा रवळजी गावकऱ्यांनी दिला असल्याचे समजते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here