मालेगाव शहरात बेकादेशीर गांजा विक्री करणाऱ्या इसमास अटक

0

मालेगाव- मा.पोलीस अधीक्षक सौ,आरती सिंह मॅडम मा, पोलीस अप्पर अधीक्षक श्री संदीप घुगे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प विभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण साहेब यांना दिनांक 2-7-2020रोजी रात्री अकराच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धुळे बाजूकडून मालेगाव शहरात एक इसम मोहम्मद गुलजार मोहम्मद कलीम उर्फ पापा त्याची मोटारसायकल क्रमांक एमएच 41/ 5289 हिच्यावर अतिक मुंबय्या, आमीन आसिफ चुहा याचे यांच्या मालकीचा गांजा घेऊन जात आहे ,बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पवारवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री ,गुलाबराव पाटील ,सो, सपोनि केलसिंग पावरा, मालेगाव शहर उपविभागीय पथकांनातील पोना,इम्रान सय्यद, सचिन बेदाडे ,सचिन थोरात ,पोशि मोरे, तसेच पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोवा सुरेश बाविस्कर , पोहवा सय्यद, पोहवा, पगारे,विनायक जगताप ,पोलीस शिपाई,अंबादास डामसे, नवनाथ शेलार ,पोलीस शिपाई राकेश जाधव ,दीपक हेंबाडे असे पथक तयार करून सदर ठिकाणी रेड करण्याबाबत सांगितल्याने ,सदर पोलीस स्थापने म्हळदे शिवार मुंबई आग्रा रोड हॉटेल जवळ सापळा रचून मोहम्मद गुलजार, मोहम्मद कलीम उर्फ पापास पकडले व त्याच्या कडील मोटरसायकल ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली ,असता त्याचे मोटरसायकलवर पाठीमागील लटकवलेल्या प्लास्टिकच्या गोणीची झडती घेतली असता त्यांच्या कडून एकूण नऊ पाकीट अमली पदार्थ गांजा मिळून आल्याने पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची पंचा समोर वजन केले, ते 46,950ग्रॅम असे असून किंमत रुपये 4,69,500 रुपये किमतीचा असल्याने पकडलेल्या इसमास सदर गांजा हा कोणाच्या मालकीचा आहे ,बाबत विचारणा विचारले असता त्याने सदर गांजा हा अतिक , आमीन ,असिफ चुहा याचे मालकीचे असून त्यांना देण्यासाठी जात आहे, बाबत सांगितले त्याच्याविरुद्ध पवारवाडी पोलीस स्टेशन ठाणेस ll 357 /2020 Ndps कायदा कलम 20(ब),22(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक केलंसिंग पावरा हे करीत असल्याचे समजते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here