सुरगाणा येथे आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या हस्ते कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ

0

कळवण (प्रतिनिधी महेश कुवर)  :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जयंती निमित्त दरवर्षी १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या कृषी दिनाचे औचित्य साधुन राज्यात १ जुलै ते ७ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. कळवण सुरगाणा पंचायत समिती व कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने कळवण सुरगाणा तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात असुन कळवण तालुक्यातील इंन्शी व सुरगाणा तालुक्यातील चिखली येथे कै. वसंतराव नाईक यांचे प्रतिमेचे पुजन करून व बळीराजाच्या प्रती स्नेह व आदरभाव व्यक्त करण्यासाठी आमदार नितीन अर्जुन पवार यांनी कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ केला. कळवण सुरगाणा मतदार संघातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी ल.पा.बंधारे बांधणे व शेतीसाठी भात, स्ट्राॅबेरी पिक, शेडनेट तसेच पाॅलीहाउस यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा शेतकऱ्यांच्या पिकाची उत्पादकता,गुणवत्ता, उत्पादनवाढ व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन आमदारांनी केले. तसेच ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेळीपालन, कुकुटपालन, दुग्ध व्यवसाय या सारखे जोडधंद्याना प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समिती व कृषी विभागाने प्रयत्न करावे तसेच त्यासाठी देखिल जास्तीत जास्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा कृषी विभागामार्फत जागर करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जावून मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रसंगी श्री संतोष देशमुख यांनी पाॅलीहाउस मध्ये काकडी व शिमला मिरची यांसारखी अपारंपारिक पिके घेवून व लॉक डाऊन काळात देखिल विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्दल त्यांचा आमदारांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री. राजेंद्र भामरे, (कळवण) तालुका अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार (सुरगाणा) विभागाचे उप विभागीय अधिकारी श्री. खैरनार , तालुका कृषी अधिकारी, श्री. पाटील ( कळवण) , तालुका कृषी अधिकारी, श्री. डमाळे (सुरगाणा) कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ, गट विकास अधिकारी, सुरगाणा तसेच सुरगाणा जि.प. सदस्या ज्योतीताई जाधव, पं.स. सदस्य एन.डी.गावीत , शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, कांग्रेस तालुकाध्यक्ष सखाराम भोये, बोरगांव सरपंच भरसट ताई, इंन्शी व चिखली येथील शेतकरी, पोलीस पाटील व ग्रामस्त या वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here