कळवण तालुक्यातील पश्चिम डोंगरावर काळ्या अळीचा मोठ्या प्रमाणात सागावर प्रादुर्भाव

0

कळवण(प्रतिनिधी महेश कुवर) :- कळवण तालुक्यातील पश्चिम भागात तसेच पुनद खोऱ्यातील अनेक भागात गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून एका अज्ञात काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय याची लोकांना धास्ती लागली आहे ,असे या भागातील वयोवृद्ध आदिवासी शेतकऱ्यांनी प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेलला प्रादुर्भाव अनुभवला आहे. अश्या गंभीर बाबी कडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ किशोर कुवर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण यांना याबाबत योग्य उपाय योजना कराव्यात यासाठी निवेदन दिले  कळवण तालुक्यातील पश्चिम पट्यात व संपूर्ण परिसरात इन्शी, गणोरे, मोहबारी, जिरवाडे, जामले, दरेगाव,  कोसुरडे,भाकुरडे, करंमभेळ,कुंमसाडी आदीसह विविध डोंगरांवर आदिवासींनी जंगल संपत्ती राखली आहे याच भागातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडे आहेत आणि जून महिन्याच्या झालेल्या पावसामुळे परिसरात व डोंगरांवर हिरवळ सर्वत्र दिसत असते आणि साग हे आपल्या मोठमोठ्या पांनामुळे अधिकच बहरत असते त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते मात्र अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र या पश्चिम पट्यात ज्या ज्या ठिकानि ही सागाची झाडे आहेत त्याठिकाणी पाने काळ्या रंगाचा अळीने खाल्यामुळे येथील डोंगरावर ठीक ठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले आहेत व सागाच्या झाडावर आलेले बहारदार हिरवीगार मोठमोठी पाने नष्ट होत आहे त्यामुळे सागाच्या झाडाच्या वाढीवर परिणाम देखील होऊ शकतो. एकूणच निसर्ग व पर्यावरनाचे अस्तित्व या भागात धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे वेळीच या अज्ञात आळीवर उपाय योजना न केल्यास तसेच अळीने इतर झाडांकडे आपला मोर्चा वळविल्यास इतर झाडे ,वनस्पति व डोंगर उताऱ्यावर असलेली शेती बरोबरच परिसरातील बागायत शेतीत याअळीने शिरकाव केल्यास आदिवासी शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे संबंधित वनविभागाने याकडे वेळीच लक्ष घालून उपाय योजना कराव्यात अशी मागणी डॉ कुवर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here