तालुक्यातील सर्व शाळा आदर्श शाळा करण्यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

0

नांदगाव : साकोरा येथील जि. प.शाळेस भेट देऊन आदर्श शाळेची पाहणी सौ.अंजुम ताई कांदे यांनी केली, या वेळी विद्यार्थी व शिक्षकांशी विविध विषयांवर चर्चा केली.याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांचे विद्यार्थ्यांना पत्र शाळेतील विद्यार्थीनीने वाचून दाखवले.राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोग्य स्पर्धात्मक वातावरणातील विद्यार्थ्यांना शिकण्याची आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे.सदर योजनेचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन अध्यापन व प्रशासन, यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन देणे आहे. शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती क्रीडा आरोग्य वैयक्तिक परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे राष्ट्रप्रेम राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देणे आहे.या प्रसंगी तालुकास्तरावरील मूल्यांकन समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी श्री.संदिप दळवी , गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले , मुख्याध्यापक राजकुमार बोरसे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, संगीता ताई बागुल, रोहिणी ताई मोरे, सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच अंजुमताई कांदे‌ यांनी आदर्श शाळेची पाहणी करुन शाळेबद्दल गौरवोद्गार काढले. अशाच प्रकारे तालुक्यातील सर्व शाळा आदर्श शाळा करण्यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्वोतपरी प्रयत्न करु असे आश्वासित केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here