माननीय पंतप्रधान मोदींजींच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भरतेकडे :डॉ भारती पवार

0

निफाड : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशातील विविध ठिकाणच्या विकसित भारत संकल्प यात्रांमध्ये लाभार्थ्यांशी दूरदृष प्रणाली द्वारे संपर्क साधला यावेळी निफाड येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार निफाड चे आमदार दिलीप बनकर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.डॉ. भारती पवार यांनी निफाड तालुक्यात विविध योजनांच्या प्रचार प्रसार विषयी तसेच लाभार्थ्यांच्या संख्ये विषयी माहिती घेतली यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की विकसित भारत संकल्प यात्रा हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही तर केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावागावांमध्ये पोहोचून भारत विकसित करण्याचा संकल्प आहे देशभर गावागावात कशाप्रकारे योजनांचा लाभ मिळत आहे याविषयी दररोज वरिष्ठ पातळीवरून आढावा घेतला जातो या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्याच्या, आयुष्यमान भारत, आवास योजनेची घरे, जलजीवन मिशन, उज्वला गॅस अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या योजना ह्या गावागावात पोहचत आहे की नाही हे पडताळून पाहणे व देशाला विकसित भारताकडे नेण्यासाठी प्रयत्न करणे हाच या यात्रेचा उद्देश असून या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्याचे काम करत असून ही संकल्प यात्रा म्हणजे विकासाचा रथ असल्याचे प्रतिपादन डॉ भारती पवार यांनी केले.या कार्यक्रमादरम्यान शंकरराव वाघ, भागवत बाबा बोरस्ते,शारदाताई कापसे,अनिल कुंदे, केशव आप्पा सुरवाडे, यतीन कदम,बापू पाटील,सारिका डेरले,संजय गाजरे, सागर कापसे, दिलीप कापसे,किशोर ढेपले, देवदत्त कापसे,सागर कुंदे, सचिन गीते, साहेबराव बर्डे,सोनाली राजे पवार, सचिन धारराव, सुरेखा कुशारे, नितीन धारराव, प्रांत हेमांगी पाटील, डीएचओ सुधाकर मोरे, तहसीलदार शरद घोरपडे, बिडिओ महेश पाटील,नगरपंचायत सीईओ अमोल चौधरी, पी. आय .महाजन साहेब,एम. ओ सुनीता ढेपले, टी.एच.ओ डॉ कोशिरे,वैद्यकीय अधिकारी डॉ तांभाळे सह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here