वैभववाडी (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)श्री, दत्त जयंती उत्सव निमित्त आणि श्री काझरेश्वर कलामंच (मुंबई) प्रस्तुत उमेश चौकेकर निर्मित, दशरथ राणे लिखित आणि विलास (बाळा) चौकेकर दिग्दर्शित तुफान मराठी हास्यप्रधान दोन अंकी नाटक “राधा हि बावरी” या नाटकाचे आयोजन श्री दत्तगुरु मंदिर पटांगण (काझरवाडी) येथे आणि पाचल, खापने वाडी या ठिकाणी करण्यात आले आहे. या नाटकात गौरव साटम, प्रसाद खापने, किशोर चौकेकर, बाबू शेट्ये, दुर्गेश साटम, शैलेश शेट्ये, भालचंद्र (आबा) गोरीवले, कार्तिका पाटोळे आणि सिनेस्टार महेश्वर भिकाजी तेटांबे आणि विलास (बाळा) चौकेकर आदी कलावंतांनी सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर निर्मिती प्रमुख राजन (बबलू) कदम, रंगभूषाकार गुरु चौकेकर, संगीतकार प्रवीण बाईत, प्रकाशयोजना राजा (सिंगर) भस्मे, वेशभूषा भालचंद्र (बबन) गोरीवाले, ध्वनी संकलन राजा धुमाळ यांचे सहकार्य लाभले असुन सुधाकर चौकेकर, गणेश नर आणि तुकाराम चौकेकर यांचे विशेष योगदान लाभले आहे. या नाटकांसाठी रंगमंच व्यवस्था श्री वेलकेश्वर सेवा मंडळ (काझरवाडी) यांनी सांभाळली असुन या नाटकाचे संपूर्ण कोकण पट्टी मध्ये दौरे करण्यात येणार आहेत असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.
Home Breaking News दत्तजयंती उत्सव निमित्त काझरवाडी येथे “राधा ही बावरी” या विनोदी हास्यप्रधान नाटकाचे...