मनमाड शहरात साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात साजरे

0

मनमाड : शहरात लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.आण्णाभाऊ साठे यांचे वंशज श्रीमती सावित्री माई साठे सून व नातू सचिनजी साठे यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.गेल्या 35 ते 40 वर्षांपासून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची समाज बांधवांची मागणी होती, आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आज मनमाड शहर येथे अतिशय भव्य दिव्य असे स्मारक उभे राहिले असून या स्मारकाचे आज लोकार्पण करण्यात आले.शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे सकाळी सावित्रीबाई साठे व सचिनजी साठे यांचे आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले.पाकीजा कॉर्नर पासून ते शासकीय उद्घाटन कार्यक्रम ठिकाण पर्यंत पायी चालत ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी प्रांत साहेब, तहसीलदार साहेब तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब, पोलीस निरीक्षक उपस्थित होते.यानंतर स्मारकाचे व पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण आणि ढोलताशांच्या गजरात मोठ्या समाज बांधवांच्या उपस्थितीत पुतळ्याच्या अनावरण झाले.यानंतर समाज बांधवांच्या आग्रहास्तव आमदार सुहास अण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांनी ठेका धरला व सर्व मातंग समाज बांधव व पदाधिकाऱ्यांसोबत नृत्य करण्याचा आनंद घेतला.यानंतर पोलीस परेड ग्राउंड मनमाड येथे सकल मातंग समाज मेळावा चे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते.यावेळी आलेल्या पाहुण्यांचे आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजूम ताई कांदे यांनी सत्कार करत स्वागत केले.या वेळी मातंग समाजाचे नेतृत्व, नगराध्यक्ष दिवंगत दिलीप भाऊ सोळसे यांना मरणोत्तर कृतज्ञता पुरस्कार त्यांच्या परिवारास देण्यात आला.या वेळी उषा ताई सोळसे व कुटुंबीय उपस्थित होते.यावेळी समाजभूषण पुरस्कार मुरलीधर ससाणे व समाजरत्न पुरस्कार बाळासाहेब थोरात पटेल यांना देऊन सन्मानित करण्यात आले.सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांना समाज गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.फरहान दादा खान यांना गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.शहर प्रमुख मयूर भाऊ यांचा गौरव पुरस्कार शिवसेना व युवासेना पदाधिकार्यांनी स्वीकारला.या कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या धनंजय अवचारे व यशवंत जी बागुल यांचा सत्कार करण्यात आला.सचिन भाऊ साठे मनोगतआण्णा भाऊ साठे यांचे साहित्य 29 देशात गाजतं आहे पण कुठल्याही लोकप्रतिनिधी ला वाटलं नाही की आण्णा भाऊंचा सन्मान मनमाड मध्ये झाला पाहिजे पण.आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ दखल घेत अतिशय भव्य दिव्य स्मारक उभे केले.आंना भाऊ साठे यांच्या साहित्याचा सन्मान करणारा, सगळ्या जात समाजातल्या लोकांना आपलं मानणारा, आपले म्हणणारा अशा लढवय्या नेत्याच्या सोबत आम्ही सदैव राहो अनेक वर्षापासून ज्याची वाट आपण पहिली कदाचित आण्णा भाऊ साठे यांचीच ईच्छा होती की हे महान कार्य माझ्या हातून व्हाव.आपण सर्वांनी मला मतदानाची भिक घातली म्हणून आज मी आमदार आहे याची मला जाणीव आहे आणि आज मी जे काही कार्य करतोय ते फक्त तुम्ही दिलेल्या ऊर्जेमुळे.माझ्या अंगाच्या कातड्याची चप्पल केली तर मी मतदारसंघातील जनतेचे उपकार नाही फेडू शकत.आपण मला ताकद दिली म्हणून मी पाणी योजना असो वा विविध विकास करू शकलो.हे स्मारक बांधून मी माझं कर्तव्य पार पाडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आहेर, बापू वाघ यांनी केले तर आभार बाळासाहेब शिरसाठ यांनी केले.मा.आमदार राजाभाऊ देशमुख, अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, राजाभाऊ अहिरे, राजेंद्र पगारे, गंगाभाऊ त्रिभुवन, नितीन पांडे, सचिन संघवी फिरोज भाई शेख, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, आसिफ शेख, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, पिंटू शिरसाठ, अमिन पटेल, अमजद पठाण, ललित रसाळ, आजू शेख, दिनेश घुगे, निलेश ताठे, पिंटू वाघ,महिंद्र गरुड, अमोल दांडगव्हल, सिध्दार्थ छाजेड, अजिंक्य साळी, प्रमोद अहिरे, स्वराज वाघ, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे लाला नागरे, महेद्र वाघ, बाबा शेख, लोकेश साबळे, मन्नू शेख, अनिल जाधव, बाबा पठाण, सनी पगारे, आसिफ पठाण, स्वराज देशमुख, कैलास सोनवणे, संदीप वावरे, महेश कापडणे,आदी मान्यवर उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here