मंगल अक्षदा कलश सह श्रीराम मंदिर येथे फरहान खान यांच्या हस्ते महाआरती

0

मनमाड :श्रीक्षेत्र अयोध्या येथील पवित्र श्रीराम जन्मभूमीवर निर्माण झालेल्या भव्य श्रीराम मंदीरातील गर्भगृहात श्रीराम लल्ला ची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास यांचेकडून आलेल्या या मंगल उत्सव प्रसंगी अर्पण करावयाचे मंगल अक्षदा कलश मनमाड शहरात स्वागत करण्यात आले. या वेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.जय माता दी मित्र मंडळातर्फे श्रीराम मंदिरात महा आरतीचे आयोजन करण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मोठ्या जल्लोषात मिरवणूकित मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.या वेळी युवासेना जिल्हा फरहान दादा खान, उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, महावीर ललवाणी, सुभाष माळवतकर, लाला नागरे, लोकेश साबळे, अमोल दंडगव्हाल, रिशिकांत आव्हाड, भूषण दरगुडे, सनी पगारे, निलेश व्यवहारेउपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here